कोपरगावात एकल वापराच्या प्लास्टिकला बंदी; नगराध्यक्ष पराग संधान यांची कठोर भूमिका
प्रतिनिधी : रोहित जोशी
कोपरगाव : शहरांमधील अनधिकृत बॅनरबाजी, फ्लेक्स आणि पोस्टरमुळे सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण होत असून वाहतुकीला अडथळा आणि दुर्घटनांचा धोका निर्माण झाल्यामुळे ही एक अत्यंत चिंताजनक व गंभीर समस्या बनली असताना याबाबत कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष पराग संधान यांनी कठोर भूमिका घेऊन अनधिकृत फ्लेक्स आणि एकल वापराचे प्लास्टिकवर निर्बंध आणले असल्याचे त्यांचे या क्रांतिकारक निर्णयाबाबत नागरिकांत कौतुक होत आहे.
कोपरगावसह कोणत्याही शहरात अनधिकृत फ्लेक्समुळे विद्रुपीकरण होत असून चौकाचौकांत, भिंतींवर आणि खांबांवर विनापरवाना लावलेले राजकीय व जाहिरातींचे बॅनर्स शहराचे सौंदर्य बिघडवतात. या प्लास्टिकच्या भस्मासुरास आ आवरण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने पावले उचलले असून दि.०१ जून २०२६ पासून त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यातून कोपरगाव शहरातील प्लास्टिक वापरास प्रतिबंध घातले आहेत. त्यात एकल वापर (सिंगल यूज) त्यात पत्रावळी, द्रोण, कागदी पेले आर्दीचा समावेश आहे. यासाठी जनजागृती हा महत्वाचा घटक ठरणार आहे हे उघड आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणास मदत होणार आहे” “कोपरगाव शहरातील पराग संधान, नगराध्यक्ष, कोपरगाव नगरपरिषद
शिवाय वाहतूक सुरक्षा धोक्यात येत असून रहदारीचे फलक आणि सूचना झाकल्या गेल्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होते व अपघातांचा धोका वाढत असल्याचे निरीक्षण आहे. स्थानिक नगरपालिका आणि न्यायालयाचे स्पष्ट नियम असतानाही राजकीय वरदहस्तामुळे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही हे मोठे दुखणे बनले आहे. संबंधित बॅनर्स फाट्ल्यानंतर ते रस्त्यावर पडतात, ज्यामुळे कचरा व अस्वच्छता पसरते. यावर कठोर उपाययोजनांची आवश्यकता असून कायदेशीर कारवाई करणे गरजेचे बनले आहे. विनापरवाना बॅनर्स लावणाऱ्या राजकीय व्यक्ती, मंडळे आणि कार्यकर्त्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासन व पोलिसांचे सहकार्य अपेक्षित बनले आहे.
परवाना नगरपालिकेच्या विभागांमार्फत नियमित मोहिमा राबवून बेकायदेशीर होर्डिंग्ज तात्काळ हटवले पाहिजेत. त्याऐवजी कागदी किंवा प्लास्टिक फ्लेक्सवजी डिजिटल माध्यमातून संदेश किंवा जाहिरातींचा पर्याय वापरण्यास शहरात कुठेही होर्डिंग उभारताना किंवा मोठ- मोठे बॅनर (पलेक्स) उभारताना, पालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून मान्यता घेणे आवश्यक असते मात्र, याकडे जनसामान्य किंवा तरुण पिढीकडून पूर्णतः काणाडोळा केला जात आहे.








