आश्वी परिसरात चोरट्यांचा हैदोस; पोलिसांच्या ढिम्म कारभाराविरोधात नागरिकांचा संताप
प्रतिनिधी : रोहित जोशी
संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या पाच दिवसांत चोरीच्या तीन धाडसी घटना घडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पानोडी येथील जाधव वस्तीवर भरदिवसा गुरु माऊली किराणा दुकानात पाणी मागण्याच्या आणि ५०० रुपयांच्या नोटेचे मुड़े मागण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने ओरबाडून नेले.
पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्र प्रयत्न केला, मात्र चोरटे पिपरी लौकीच्या दिशेने दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी ठरले. संपूर्ण प्रकारात पोलिसांची चालढकल पोलिसांकडून ठोस तपास, सीसीटीव्ही फुटेजची वेळेत पाहणी किया आरोपींचा माग काढण्याचे प्रभावी प्रयन होताना दिसत नाहीत.
त्यामुळे आश्वी पोलिसांच्या वा सुस्त कारभाराची दखल घेऊन अहिल्याणरच्या जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, तपासाची सखोल समीक्ष करावी आणि तक्रारदारांना ताटकळत ठेवणाऱ्या कर्मचा-यांवर कठोर कारवाई करत आरोपींना तात्काळ जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी संपूर्ण परिसरातून केली जात आहे.
चोरट्यांच्या हिमतीपेक्षाही आश्वी पोलिसांच्या निष्काळजी आणि ढिम्म कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भरदिवसा घडलेल्या या जबरी चोरीनंतर पीडित कुटुंब जेव्हा तत्परतेने तक्रार देण्यासाठी आश्वी पोलिस ठाण्यात पोहोचले, तेव्हा त्यांना चेट उद्या या असे सांगून माघारी धाडल्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आरोप पीडितांनी केला आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सुरुवातीचे क महत्त्वाचे असतात, हे माहीत असतानाही पोलिसांनी दाखवलेल्या बा उदासीनतेमुळे सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. श्रीमंत किया वजनदार व्यक्तीच्या बाबतीत घडलेल्या घटनेवर अशीच भूमिका घेतली असती का, असा चेट सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. विशेष म्हणजे, आश्वी बुद्रक दाढ बुद्रुक सत्यावरील ५ ऑगस्टची घटना असो या १० ऑगस्ट रोजी निमगाव जाळी येथे झालेली तीन घरांची घरफोडी असो; चोरट्यांची गुन्हे करण्याची आणि दुचाकीवरून पसार होण्याची एकाच टोळीचा हात असण्याची दाट शक्यता आहे.








