सावळीविहीर बु. ग्रामपंचायत उपसरपंच पद निवडणूक संविधानात्मक पद्धतीने झाली नाही- विकास जपे
शिर्डी प्रतिनिधी
सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत ही पंचक्रोशीतील महत्त्वाची व मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच ओमेश जपे तर उपसरपंच म्हणून विकास जपे यांनी ग्रामपंचायतीची धुरा सांभाळली होती. दि. 3/7 2026 रोजी विकास जपे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची जागाही रिक्त झाल्याने पुन्हा निवडणूक घेण्यात आली. दिनांक 31/7/2026 रोजी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये विकास नानासाहेब जपे व दत्तात्रय जिजाबा आगलावे यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केले यात दत्तात्रय आगलावे यांची निवड 4/12 झाली. परंतु सदर उपसरपंच पदाची निवड ही संविधानात्मक मार्गाने झाली नसल्याचे विकास नानासाहेब जपे यांनी सांगितले.
या संपूर्ण उपसरपंच पद निवडणूक प्रक्रिये बाबत विकास नानासाहेब जपे यांनी सर्व माहिती व अहवाल माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे दाखल केला असून सावळी ग्रामपंचायत सर्व सदस्यांना नोटीस बजावण्यात आले आहे. दि. 25/ 8 /2026
रोजी अ अप्पर जिल्हा अधिकारी शिर्डी यांच्यासमोर अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या कार्यालयातील न्यायालयीन कक्षाकडे सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.
या सर्व घटने बाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून उपसरपंच पदाची निवडणूक संविधानात्मक नियम पद्धतीने झाली.. का. नाही. याबाबत उलट सुलट चर्चा जोर धरून आहे.
याबाबत विकास नानासाहेब जपे यांना विचारणा केली असता चुकीच्या पद्धतीने हे निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली आमची मागणी गुप्त पद्धतीने मतदान करण्याची असताना जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांनी ओपन पद्धतीने मतदान करून नियमाचे उल्लंघन केले आहे .
विदाऊट ऑथर्टी लेटर नसताना 3 ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान करून घेण्यात आले. उपसरपंचाच्या निवडीच्या प्रक्रियेत सदस्य सोडून कोणतेही व्यक्ती असू नये परंतु मतदान कक्षात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. या उपसरपंच निवडीमध्ये दडपशाहीचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अध्यक्ष म्हणून सरपंच ओमेश जपे यांच्या मार्गदर्शना खाली ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली.
या संपूर्ण घटनेचे फुटेज माहिती ग्रामसेवकाने दिलेले लेखी पत्र पुरावेमाझ्याकडे असून तरी कृपया या चुकीच्या मार्गाने झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत संविधानात्मक मार्गाने मला न्याय हवा आहे असे शेवटी विकास नानासाहेब जपे यांनी सांगितले








