कोल्हार येथील शेत मजुराच्या लेकीची भरारी; अमृता पानखडे एमपीएससी परिक्षेत उत्तीर्ण
प्रतिनिधी : हिना उबाळे
राहता : दि. २६ ऑगस्ट २०२६, जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीत कोल्हार येथील अमृता भागवत पानखडे हिने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून आपल्या कुटुंबाच्या संघर्षाला यशाचा मुकुट चढविला आहे. १४ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या निकालात तिची सेल्स टॅक्स अधिकारी पदासाठी निवड झाली आहे.
विशेष म्हणजे ट्रक चालक असलेल्या वडिलांचेनिधन झाल्यानंतर ही खचून न जाता शेत मजुरी करणाऱ्या आईच्या कष्टाला बळ देत अमृताने आई वडील यांचे स्वप्न साकार केले.
अमृताच्या घरची परिस्थिती हलाखीची होती आई, वडील दोन भाऊ आणि एक बहीण असा कुटुंबाचा गाडा वडील वडील ट्रक चालून व आई शेत मजुरी करून ओढत होते. सुमारे दोन वर्षापूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर चुलता भाऊ योगेश पानखडे याने कुटुंबाला आधार दिला.
अमृताने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, दहावी रयत हायस्कूल, बारावी एम जी विद्यालयातून तर पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून केली.
त्यानंतर जवळच्या दीप स्तंभ फाउंडेशन मधून मोफत प्रवेश घेत तिने एमपीएससी ची तयारी केली आणि यश मिळविले तीच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.








