व्हेंटिलेटर च्या स्फोटापासून फायर ऑडिट पर्यंत तपास; दोषीवर फौजदारी कारवाई !
अमरावती : पी.एन. देशमुख
अमरावती : दि. २६ ऑगस्ट २०२६, येथे स्त्री रुग्णालयात अत्यंत वेदना देणारी घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नेमण्यात आली असून येथे आठ दिवसांच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा कॉन्ट्रॅक्टदाराला पाठीशी घातल जाणार नाही, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी सांगितले आहे. आगीच्या घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांनी अमरावतीत दाखल होत घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहिली केली आणि पीडित कुटुंबांना न्याय देण्याच आव्हान दिले.
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही उच्चस्तरीय समिती केवळ वरची चौकशी करणार नाही तर समस्याचे खोलवर जाऊ प्रकरण्याचा शोध घेणार आहे ज्या वेंटीलेटरचा स्पोट झाला त्याची गुणवत्ता वीर यंत्रणेतील अंतर्गत दोष, फायर एडिट मधील आणि प्रशासकीय त्रुटी तपासणी.
या समितीत महावितरणाचे मुख्य अभियंता, गेम्स अधिकारी तसेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संशोधनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. येथे आठ दिवसात हा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्यांना कठोर फौजदारी कारवाई केली जाईल असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार सुलभा खोडके, महापूर श्रीचंद तेजवानी, आरोग्य विभागाचे प्रथम सचिव डा. निपुण विनायक, विभागीय आयुक्त नयना गुंडे, आरोग्य विभागाचे संचालक डा. नितीन अंबाडेकर, जिल्हाधिकारी आशिष वेरेकर, मनपा पक्षनेते चेतन गावंडे अविनाश मार्डीकर मनपा विरोधी पक्षनेते विलास भाऊ इंगोले आदी उपस्थित होते.








