घोटी ग्रामपंचायत ग्रामसभेस उपसरपंचासह सर्वच ग्रामपंचायत सदस्याची दांडी
सरपंचाच्या एकतर्फी वागण्यामुळे गावाचा विकास खुंटला गावाकऱ्यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी : सतिश घुले
किनवट : दि. २६ ऑगस्ट २०२६, शहरापासून अगदी पाच की. मी. अंतरावर असलेली ग्रामपंचायत घोटी हे पेसा क्षेत्रा अंतर्गत येत असून या ग्रामपंचायतेस शासनाचा मुबलक निधी उपलब्ध असतो परंतु येथील सरपंच यांच्या एकला चलो रे धोरणा मुळे गावचा विकास पूर्णतः खुंटला आहे असे गाव कऱ्यांचे म्हणणे आहे, त्यातच दि. 24 ऑगष्ट 2026 रोजी घेतल्या गेलेल्या ग्रामसभेस तर गावातील उपसरपंचा सह एकही ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेस हजर नव्हते, यावरून सरपंच यांची विकास हीन दृष्टी दिसून येतें, ग्रामसभेस ग्रामसेवक संघटना यांचा बहिष्कार असल्या मुळे येथील ग्रामसेवक हजर राहू शकले नाहीं, त्यांच्या जागेवर घोटी जि. प. प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री जगदीश कोमलवार यांनी ग्रामसभेचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळला असला तरी ग्रामसभेचे अध्यक्ष, सरपंच यांनी ग्रामसभेत मांडवयाचे नियोजित एकाही मुद्यावर व्यवस्तीत उत्तरे नं देता केवळ पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला व अगदी 40 मिनिटाच्या आत आलेल्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ग्रामसभा आटोपती घेण्यात आली असे ग्रामसभेतील उपस्थित नागरिकांचे म्हणणे आहे.








