भडगाव, रोटरी क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अल्पदरात सायकल वाटप
प्रतिनिधी : डॉ. योगेश गोसावी
भडगाव : दि. २६ ऑगस्ट २०२६, तालुक्यातील वाडे येथे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुलभ व सुरक्षित साधन उपलब्ध व्हावे, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने रोटरी क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ २,००० रुपयांच्या अत्यल्प दरात सायकलींचे वाटप करण्यात आले. माध्यमिक विद्यालय, वाडे येथे मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही. टी. पाटील होते. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एन. के. पाटे, ज्येष्ठ शिक्षक श्री. पी. एम. बागुल, सौ. बी. जे. पवार, श्री. एस. एस. पाटील तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, सायकली मिळालेल्या विद्यार्थ्यांचे पालकही या कार्यक्रमास उपस्थित होते.
रोटरी क्लबच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. केवळ २,००० रुपयांच्या अत्यल्प दरात सायकली उपलब्ध करून देत रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
या सायकली विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी श्री. ए. एस. हडपे, श्री. बी. ए. परदेशी, श्री. बी. डी. पाटील आणि मुख्याध्यापक श्री. व्ही. टी. पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळू शकला.
कार्यक्रमाचे अतिशय प्रभावी सूत्रसंचालन श्री. बी. ए. परदेशी यांनी केले. त्यांच्या ओघवत्या व प्रभावी निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमादरम्यान शिस्त व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी श्री. एस. डी. मोरे , श्री. एस. ए. साळुंखे, श्री. के. आर. जाधव, श्री. एन. व्ही. पाटील, श्री. डी. ए. पाटील, श्री. एस. बी. पाटील आणि श्री. डी. एस. पाटोळे यांनी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व सुरळीतपणे पार पडला.
यावेळी श्री. ए. आर. कोळी यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सायकल मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता, तर उपस्थित पालकांनीही रोटरी क्लबच्या व शालेय व्यवस्थापनाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला चालना देणारा, त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा रोटरी क्लबचा हा उपक्रम विद्यार्थीहिताचा अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम ठरला. विद्यालयाच्या वतीने रोटरी क्लबचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. भडगाव तालुका प्रतिनिधी डॉ.योगेश गोसावी , भडगाव,मो.8320096820
दि. २५ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुलभ व सुरक्षित साधन उपलब्ध व्हावे, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने रोटरी क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ २,००० रुपयांच्या अत्यल्प दरात सायकलींचे वाटप करण्यात आले. माध्यमिक विद्यालय, वाडे येथे मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही. टी. पाटील होते. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एन. के. पाटे, ज्येष्ठ शिक्षक श्री. पी. एम. बागुल, सौ. बी. जे. पवार, श्री. एस. एस. पाटील तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, सायकली मिळालेल्या विद्यार्थ्यांचे पालकही या कार्यक्रमास उपस्थित होते.
रोटरी क्लबच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. केवळ २,००० रुपयांच्या अत्यल्प दरात सायकली उपलब्ध करून देत रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
या सायकली विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी श्री. ए. एस. हडपे, श्री. बी. ए. परदेशी, श्री. बी. डी. पाटील आणि मुख्याध्यापक श्री. व्ही. टी. पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळू शकला.
कार्यक्रमाचे अतिशय प्रभावी सूत्रसंचालन श्री. बी. ए. परदेशी यांनी केले. त्यांच्या ओघवत्या व प्रभावी निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमादरम्यान शिस्त व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी श्री. एस. डी. मोरे , श्री. एस. ए. साळुंखे, श्री. के. आर. जाधव, श्री. एन. व्ही. पाटील, श्री. डी. ए. पाटील, श्री. एस. बी. पाटील आणि श्री. डी. एस. पाटोळे यांनी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व सुरळीतपणे पार पडला.
यावेळी श्री. ए. आर. कोळी यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सायकल मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता, तर उपस्थित पालकांनीही रोटरी क्लबच्या व शालेय व्यवस्थापनाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला चालना देणारा, त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा रोटरी क्लबचा हा उपक्रम विद्यार्थीहिताचा अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम ठरला. विद्यालयाच्या वतीने रोटरी क्लबचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.