राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविणार : अण्णासाहेब कटारे (राष्ट्रीय अध्यक्ष)
प्रतिनिधी : राजेंद्र दूनबळे
शिर्डी : दि. २६ ऑगस्ट २०२६, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक शिर्डी अहिल्यानगर येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्साहात संपन्न झाली. या राज्यव्यापी बैठकीस महाराष्ट्रातील समस्त नेते /पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते. सदर बैठकीत बोलतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की देशात व राज्यात सध्या जातीय/धर्माच्या राजकारणाने शिखर गाठले आहे जात व धर्मा शिवाय चर्चा नाही देशातील राज्यातील सर्वसामान्य गरीब घटकांचे अनेक जीवनमरणाचे प्रश्न प्रलंबित आहे. परंतु येथील प्रस्थापित राजकारणी सोईस्करपणे काना डोळा करीत आहे.जातीय /सांप्रदायिक राजकारणामुळे येथील छोटे जातीय समूह असुरक्षिततेच्या वातावरणात दिसत आहे खून -दरोडे -हिंसाचार महिला व तरुणीं वरील वाढते अत्याचार दलित मागासवर्गीयांवर होत असलेले हल्ले अत्याचार याने तर कहर केला आहे.
राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्व पायदळी तुडवून घटनात्मक पदावर असलेले लोकप्रतिनिधी विषारी बोलून जाती जातीत अशांतता निर्माण करीत आहे त्यांना कुणाचाही धाक नाही.
छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राज्यातील थोर पुरोगामी संतांच्या विचारांचे राजकारण यापुढे सर्वांनाच करावे लागेल त्याशिवाय गत्यंतर नाही “राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने तर संपूर्ण महाराष्ट्रात संपर्क अभियान” सुरू करण्याचा ठराव आजच्या बैठकीत पारित केला आहे, वाडी-वस्ती- गाव- शहर- तालुका जिल्हास्तरावरील नागरिकांशी थेट संपर्क करून तेथील स्थानिक प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी आंदोलनची दिशा ठरविली जाईल.
राज्यात सध्या अनेक पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची देखील आग्रही मागणी आहे सर्वच रिपब्लिकन नेत्यांनी देखील एकत्र आल्यास राज्यात एक आगळीवेगळी आपली ताकद निर्माण होईल यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष पुढाकार घेणार असून सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी प्रत्यक्ष संपर्क करून रिपब्लिकन ऐक्य ची चर्चा गतिमान करणार आहे.
यावेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शांताराम बापू थोरे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संतोषजी मोकळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ साबळे, युवा नेतृत्व महाराष्ट्र बिपिन कटारे,उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्क प्रमुख रमाताई भालेराव,महाराष्ट्र जनसंपर्कप्रमुख सचिन भाऊ नांगरे, प्रदेश सचिव आर. बी. जगताप, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनील जी जगताप, अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष संजयजी लहासे,महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख युवा आघाडी संतोष भाऊ राजगुरू, युवा नेतृत्व येवला तुषार भाऊ वाघ, युवा नेतृत्व प्रशांत कटारे, नाशिक जिल्हा सरचिटणीस ना शाहीर नंदकुमार खरात, आदी उपस्थित होते.








