कैलास शेळके यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
राहुरी : दि. २७ ऑगस्ट २०२६, राहुरी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते कैलासराव एकनाथ शेळके यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी प्रभावीपणे काम करण्याची ग्वाही शेळके यांनी दिली.
संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिमांशू राज यांच्या हस्ते कैलास शेळके यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यापूर्वीही कैलास शेळके यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ‘महसूल मित्र’ तसेच ‘पोलीस मित्र’ म्हणून गौरविण्यात आले आहे. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून समाजातील वंचित व गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.
या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून कैलास शेळके यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.








