जागतिक छायाचित्र दिनानिमित्त किनवट फोटोग्राफर संघटना तर्फे वरिष्ठ व सेवानिवृत्ती फोटोग्राफरचा सन्मान
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरमवार
किनवट : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त किनवट फोटोग्राफर संघटना द्वारा वरिष्ठ व सेवानिवृत्त फोटो ग्राफराचा सत्कार, नवीन फोटो ग्राफर परिचय आणि मार्गदर्शन, विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला या उत्कृष्ट कार्यक्रमाची चर्चा शहरात होत आहे नुकताच किनवट शहरातील व्ही आर गार्डन येथे किनवट फोटो ग्राफर संघटनाच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते.
या कार्यक्रमांचे अध्यक्षास्थानी मा नगराध्यक्ष के मूर्ती अण्णा हे होते प्रमुख पाहुणे म्हणून फुलाजी गरड पाटील , उमाकांत नारलावार, उल्हास दिसलवार, बापुराव भंडारे, शेषराव गिमेकर, लक्ष्मीपति दोनपेलीवार आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॅमेरा चा विधीवत पूजा अर्चा करण्यात आला त्यानंतर फोटो ग्राफी क्षेत्रातून निवृत्त झालेले व वरिष्ठाचा संघटना च्या वतीने सत्कार करण्यात आला आयोजक व फोटो ग्राफर संघटना चे अध्यक्ष मार्कंडेय अंगलवार सह गजु गरड, गजानन पतीवार, के स्वामी, श्याम कदम, गणेश बिंगेवार, केवल दोनपेलीवार, सुरेश कालासवार, अविनाश भालेराव, दत्तोपंत वाघमारे, शंकर भंडारे, विवेक डोंगरे, दिपक गादेवार, गजानन दर्शन वाड, अविनाश राठोड,अजय पवार, सम्यक उमरे, निवेदक कानिदे, मारोती आत्राम, मुकेश जाधव, अयान, कृष्णा जाधव, पवन निलमवाड, जयपाल कानिदे, प्रशांत रेडीवार, डीके सारखनी, व्यंकट बेकमवार आदि होते जिलानी प्लाझा फोटो फ्रेम वाला स्टॉल लावला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाला शहर व ग्रामीण भागातील फोटो ग्राफर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या वेळी उत्कृष्ट नियोजन व कार्यक्रमांची चर्चा शहरात होत आहे








