ग्रामसभेत हिशोब मागितल्याने पत्रकारावर प्राणघातक हल्ला शेकापूर येथील खळबळजनक घटना
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरामवार
किनवट – माहूर तालुक्यातील शेकापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गावातील विकासकामांचा हिशोब आणि खर्चाची माहिती मागितल्याच्या रागातून उपसरपंचाचे पती सुनील बेहेरे व त्यांच्यासोबत असलेल्या 5 ते 6 गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भीम टायगर सेनेचे तालुका संपर्क प्रमुख तथा निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे यांच्यावर अमानुष हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे समाधान कांबळे यांचा जीव वाचला आहे.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, माहूर तालुक्यातील शेकापूर गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात पत्रकार समाधान कांबळे हे नेहमी प्रखर असतात त्यामुळे गावातील भ्रष्ट व असामाजिक तत्व नेहमी समाधान कांबळे यांच्यावर टपून असतात यापूर्वी समाधान कांबळे यांच्यावर तीन ते चार वेळेस हल्ला करण्यात आला त्यांच्या विरोधात अनेक खोट्या तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु या सर्व बाबींना नजुमानता कशाची भीती न बाळगता समाधान कांबळे यांनी समाजकार्य व निर्भीड पत्रकारिता सुरू ठेवली जिथे कुठे भ्रष्टाचार झाला असेल त्याबाबत अग्रेसर होऊन आवाज उठविला आहे असाच प्रकार 27 ऑगस्ट रोजी शेकापूर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये कांबळे यांनी उपसरपंच यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत ग्रामपंचायत मध्ये झालेल्या खर्चाचा हिशोब मागितला यावर चिडून जाऊन उपसरपंचांचे पती सुनील बेहेरे यांनी कांबळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला सोबत गावातील पाच सहा गुंड प्रवृत्तीचे लोक समाधान कांबळे यांच्यावर तुटून पडले त्यात सुनील बेरे यांनी कांबळे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार वार केले जात ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले असे असतानाही गुंडांनी त्यांच्यावरील हल्ला थांबवला नाही प्रकरणाचे गांभीर्य ओळखून काही ग्रामस्थांनी मध्यस्थी करत समाधान कांबळे यांचा बचाव करत त्यांना तात्काळ घटनास्थळावरून माहूर येथील रुग्णालयात हलवले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माहूर रुग्णालयातून प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळ येथे पाठवण्यात आले बातमी लिहीपर्यंत आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन माहूर येथे पुन्हा नोंदविन्याची प्रक्रिया सुरू होती.
या भ्याड आणि प्राणघातक हल्ल्याचा किनवट तालुका निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे तीव्र शब्दात जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी निर्भय व ग्रामीण युवा पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार किनवट तालुका अध्यक्ष मार्कंडेय विश्वनाथ सिरामवार,अनिल माडपेलीवार,नागभुषण येंबरवार, कुंदन तिवडकर, मनोज जाधव, शेख मोईन, रफिक गौड, यांनी केली आहे.
वेळेत कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार संघटना व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.








