भंडारा जिल्हा संयुक्त कलाकार महासंघ अध्यक्ष पदी भावेश कोटांगले यांची निवड
विशेष प्रतिनिधी : प्रदीप कडबे
भंडारा : जिल्ह्यातील सर्व कलावंत संस्था मिळून एक महासंघ तयार करण्यात आला. व त्या महासंघाला भंडारा जिल्हा संयुक्त कलाकार महासंघ असे नाव देण्यात आले. हा महासंघ जेव्हा कलावंतांवर अन्याय अत्याचार होत आहे अशा वेडी या महासंघाच्या वतीने न्याय मिळवुन देण्यासाठी संगीतमय आंदोलन, धरणे आंदोलन, अशा विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. म्हणून आज अस्मितेचा एल्गार कार्यालय भंडारा येथे परमानंद मेश्राम सामाजिक चळवळीचे नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत या महासंघाची कार्यकारिणी तयार करण्यात आली.
त्यामध्ये अध्यक्ष भावेश कोटांगले, उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम बोंदरे, सचिव गणेश आथीलकर, सहसचिव नत्थू बांते ,कोषाध्यक्ष सोमप्रभू तांदुळकर,संचालक अमित हारगुडे, उमेश भोयर,लक्ष्मीकांत मेश्राम,अंबादास नागदेवे,नाशिक चवरे, गणेश देशमुख, मारोती निंबार्ते, शत्रुघ्न वैद्य यांची निवड करण्यात आली. तसेच या महासंघाच्या वतीने ३१ ऑगस्ट, २०२६ ला कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी भव्य संगीतमय आंदोलन करण्यात येणार आहे, त्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वस्तरीय कलावंतांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.








