स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी दोन वर्षा पासून फरार आरोपी जेरबंद.
(यवत उरुळी कांचन हद्दीतील १९ गुन्ह्यामधिल दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी शिक्रापूर येथून ताब्यात.)
दौंड यवत व उरळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी मधील एकूण १९ गुन्ह्यामध्ये दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी नामे हनुमंत बंडू उर्फ फोट्या काळे वय अंदाजे ४० रा राक्षसवाडी ता कर्जत जि.अहिल्यानगर हा शिक्रापूर परिसरामध्ये येणार असल्याची गोपनीय माहितीचे आधारे समजले.कि सदर आरोपी त्याचे इतर साथीदार पकडले पासुन. फोट्या काळे हा मुळ गावी राक्षसवाडी येथे न राहता इतर ठिकाणी नाव बदलून राहत होता. सदर आरोपीस पोलीसांनी शिक्रापूर येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी यवत पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
दौंड तालुका यवत पोलीस स्टेशन हद्दीतील व उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी घरफोडीचे तब्बल १९ गुन्ह्यामधिल आरोपी हा गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई केली. सदर आरोपी हा घरफोडीच्या विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. गुन्हे केल्यानंतर तो मागील दोन वर्षांपासून स्वताचे नाव बदलून पोलिसांना चकवा देऊन फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सातत्याने प्रयत्न करीत होते. दरम्यान, आरोपीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीच्या अटकेमुळे दौंड, यवत आणि उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील १९ घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पुढे जाण्यास मदत होणार आहे.
या धाडसी कारवाईमुळे चोरी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील व उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल. अप्पर पोलीस अधिक्षक. गणेश बिरादार. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस . निरीक्षक प्रमोद क्षीरसागर. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर राऊत. सहाय्यक पोलीस फौजदार सचिन घाडगे सहाय्यक पोलीस फौजदार आसिफ शेख. पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड
पोलीस हवालदार सुभाष राऊत यांनी केली आहे…








