प्रवरानगर येथे विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य व कलागौरव पुरस्काराचे दिमागदार वितरण
प्रतिनिधी : हिना उबाळे
भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वी आपल्या मराठी शाळा सुधारण्याचा आग्रह धरावा लागेल. मराठी शाळा आणि पुस्तके पुरविणारी ग्रंथालय हीच मराठीची खरी वस्त्रे आहेत. खरा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर , मराठी साठी धाडसाने पावले उचलावी लागतील, तुमच्या खांद्यावर झेंडा कोणताही असू द्या, पण त्याचा दांडा मात्र मराठीचाच ठेवा, असा कळकळीचा आणि, असा आश्वासक सूर 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी आळवला.
सहकार चळवळीचे जनक. पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या 126 व्या जयंतीच्या औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय, साहित्य कला गौरव आणि प्रबोधन पुरस्काराच्या वितरण सोहळ्यातील अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला , या सोहळ्याला जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार अमोल खताळ, आमदार प्राजक्ता तनपुरे, माजी आमदार लहू कानडे, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.








