कट्ट्यातुन हवेत फायर करणा-यास अटक करून देशी कट्टा व जिवंत काडतुस केले हस्तगत
प्रतिनिधी बशीर तडवी,
जळगाव: वरील विषयान्वये सविस्तर रिपोर्ट आहे की दिनांक 27/08/2026 रोजी रात्री 08.00 वाजेचे सुमारास कोळन्हावी येथील सरपंच नामे विकास उर्फ गोटु जगन्नाथ सोळंके याने मौजे डांभुर्णी ता. यावल येथे चौकात येवून गावठी कट्ट्यातुन हवेत फायर केलेला आहे अशी माहीती पोलीस निरीक्षक श्री. रंगनाथ धारबळे यावल पो. स्टे. यांना मिळाल्यावरुन पो.नि. धारबळे, पोउनि मैनुद्दीन सय्यद, पोहेका रोहील गणेश, पोका अनिल साळुंखे, पोका हितेश बागुल असे तात्काळ घटनास्थळी पोहचले व परीस्थीतीची पाहणी केली असता त्यांना किनगाव रोडलगत शिवसम्राट सोयाबिन बिर्याणी चे दुकानाजवळ एक नुकतेच फायर केलेल्या राऊंडची रिकामी पुंगळी मिळुन आल्याने तसेच आजुबाजुस असलेल्या दुकानचालकांकडे केलेल्या विचारपुस वरून सदर ठिकाणी विकास जगन्नाथ सोळंके यांनी फायरींग केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनला घटनास्थळी पाचारण करुन त्यांचे मार्फत घटनास्थळावरील रिकामी पुंगळी व इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले. सदर फायरींग केल्यानंतर आरोपी जळगाव कडे निघून गेल्याचे समजल्याने पोउनि अनिल महाजन, पोकों 01 सचिन पाटील यांना जळगाव येथे पाठवून आरोपी विकास जगन्नाथ सोळंके याचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या. सदर अधिकारी/अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि सोपान गोरे व त्याचे पथकातील पोहेका सलीम तडवी, पोका प्रदीप चवरे, पोका सचिन घुगे यांनी आरोपीस ताब्यात घेण्यासाठी संयुक्त शोध मोहीम राबवून आरोपी विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके वय 37 वर्षे रा. कोळन्हावी ता. यावल यास रात्री 01.00 वाजेचे सुमारास कालंका माता मंदीर जळगाव परीसरातुन ताब्यात घेण्यात आले.
त्यास यावल वल पोलीस स्टेशन येथे आणुन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व चौकशी दरम्यान असे निष्पन्न झाले की आरोपी हा कोळन्हावी ग्रामपंचायत येथे विद्यमान सरपंच पदावर असून त्याचे कोळन्हावी गाव परीसरात आदर्श हॉटेल, बियर बार व परमीट रूम असुन डांभुर्णी गावातील काही मुले त्याचे हॉटेल बियर बार वर येवून मोबाईल वर व्हीडीओ काढून त्यास नेहमी त्रास देत असल्याने व दिनांक 26/08/2026 रोजी आरोपींचे त्यांचेशी भांडण झाल्याचे कारणावरून त्यांचेवर दहशत निर्माण करण्यासाठी काल दि. 27/08/2026 रोजीचे रात्री 08.00 वाजता त्यांचेच गावात डांभुर्णी येथे येवून गावठी पिस्टलमधुन हवेत गोळीबार केला असल्याची कबुली दिली व सदर गोळीबार कामी वापरलेले हत्यार त्यांने कोळन्हावी गावाचे शिवारात असलेले त्यांचे मालकीचे आदर्श हॉटेल जवळील शेतात लपवून ठेवलेले असल्याचे सांगीतल्याने सदर ठिकाणी जावून एक गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगजीनसह व एक जिवंत राऊंड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन आरोपीविरुध्द
भा. न्या. सं. कलम 125 व भारतीय हत्यार कायदा कलम 3 (1), 25 (1-ब), 5(1),25(1)(अ), 25 (9), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनात पोउनि मैनुद्दीन सय्यद हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे सो. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर सो. यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक श्री. रंगनाथ धारबळे, पोउनि मैनुद्दीन सय्यद, पोउनि अनिल महाजन, सफौ हेमंत सांगळे, पोहेका / 3070 रोहिल गणेश, पोका 226 हितेश बागुल, पोकॉ 01 सचिन पाटील, पोका 1803 अनिल साळुंखे, चालक पोका संतोष पाटील यांनी केलेली आहे.








