ईद मिलादुन्नबी निमित्त अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम
पिंपरी : ईद मिलादुन्नबीच्या पवित्र निमित्ताने अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या वतीने पिंपरी चौक येथे आलेल्या जुलूस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जुलूसमध्ये सहभागी झालेल्या बांधवांसाठी संस्थेच्या वतीने बिस्कीट व पाण्याचे वाटप करण्यात आले.
ईद मिलादुन्नबी हा प्रेम, बंधुभाव, मानवता आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. या निमित्ताने समाजातील विविध घटकांमध्ये आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी वाढावी, या उद्देशाने अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जुलूस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच जुलूसमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना बिस्कीट व पाणी वाटप करून त्यांच्या सेवेसाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले.
या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष नशीम सलमानी,कार्याध्यक्ष कासिम उस्मान शेख, सिकंदर अयुब शेख, मार्गदर्शक महबुब हनीफ शेख, जनसंपर्क प्रमुख जलालुद्दीन साहेबदीन शेख, उपकार्याध्यक्ष कादिर इदरीस शेख, उपाध्यक्ष सरफुद्दीन वाजिद शेख, सेक्रेटरी साजिद कुद्दूस शेख, उपसेक्रेटरी समशेर सत्तार शेख, खजिनदार रिजवान मतीन शेख तसेच सलमान बिस्मिल्लाह शेख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या वतीने यापुढेही समाजहिताचे, सामाजिक एकोपा वाढविणारे आणि मानवतेचा संदेश देणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.








