शिवसेनेचे झुंजारनेते ज्योतिबा खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त – नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरमवार
किनवट : शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख, लोकनेते ज्योतिबा खराटे यांचा वाढदिवस दि 7 सप्टेंबर रोजी किनवट शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी व वेगवेगळे उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात येणार असून या निमित्त साईवंदना मंगल कार्यालयात महाराष्ट्राचे ख्यातनाम विद्रोहीकवी, दंगलकार, सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांच्या जाहीर व्याख्यानाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे भूषवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या बेबीताई प्रदीप नाईक यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.या कार्यक्रमास शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, भुजंग पाटील, यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, किनवट नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ सुजाता विनोद एंड्रलवार,माहूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. या वाढदिवसानिमित्त किनवट शहरासह ग्रामीण भागात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला जाणार आहे तर वाढदिवसाच्या औचित्यावर दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वा.साईवंदना मंगल कार्यालयात महाराष्ट्राचे ख्यातनाम विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने स्वीकृत नगरसेवक तथा शहरप्रमुख प्रशांत कोरडे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील युवासेनेचे तालुकाप्रमुख अतुल दर्शनवाड,माजी शहरप्रमुख संतोष यलचलवार, शहर संघटक किशोर बोलेनवार यांनी केले आहे.
“शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमचे लोकनेते ज्योतिबादादा खराटे हे शोषित उपेक्षित वंचितांसाठी लढा देणारे झुंजार नेते आहेत. त्यांनी नेहमीच समाजकारणाला अग्रक्रम दिला आहे.त्यांचा वाढदिवस केवळ औपचारिक सोहळा न राहता समाजाचे वैचारिक प्रबोधन व्हावे या उदातहेतूने आम्ही सर्व शिवसैनिकांनी सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.वाढदिवसा निमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम या भागातील जनतेसाठी एक पर्वनी ठरणार आहे.
मुख्यआयोजक
प्रशांत कोरडे
स्वीकृत नगरसेवक








