महावितरण कंपनीला कधी जाग येणार मुके प्राणी व लोकांच्या जीवाशी खेळ
प्रतिनिधी : कांताभाऊ राठोड
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत चिंचवड ,निगडी ,पिंपरी, चिखली तसेच लगतच्या परिसरामधील महावितरण कंपनीच्या वतीने बसवण्यात आलेल्या डीपी बॉक्स बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत ,उघड्या अवस्थेत दिसतात, त्यामुळे अनेक वेळा अनेक मुक्या प्राण्यांचा तसेच लोकांचा सुद्धा जीव गेलेला आहे .करंट लागलेल्या घटना घडत आहेत आहे तरी महावितरण कंपनीला जाग येत नाही . अजून किती जणांचा जीव जाणार आहे याची वाट पाहत आहे का याच्याकडे प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही का गेली अनेक वर्षे या प्रकरच्या खुल्या डीपी बॉक्स आणि खुल्या विद्युत वहन करणाऱ्या तारा/वायरीमुळे अनेक प्राणहानी झाले असून या पुढे कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी सामाजिक जागृती व्हावी म्हणून आपल्या भागातील दुर्घटना टाळण्यासाठी मदत होईल व असे कुठेही उघडे व तुटलेले बॉक्स दिसले तर स्थानिक नागरिकांनी आपल्या भागातील वायरमेनला ताबडतोब कळवावे व आपल्या भागातील महावितरण कंपनी तसेच लोकप्रतिनिधी यांना सांगून ताबडतोब दुरुस्त करून घेण्यात यावे. ही काळजी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी सामाजिक कार्यकर्ते व ५२२०, विभाग नाईक पुणे शहर दल श्री उमेश रमेश लोंढे यांनी याचा पाठपुरावा केलेला आहे याप्रमाणे सर्व नागरिकांनी जनजागृती करावी.








