*भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा हदगाव कार्यकारणीची निवड.*
हदगाव : गौतम कदम
बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची स्थापना केली आहे. भारतीय बौद्ध महासभा ही आंबेडकरी चळवळीची मातृसंस्था आहे. दोन महिन्यापूर्वी नांदेड जिल्हा उत्तर कार्यकारिणीने हदगाव तालुका शाखेची कार्यकारणी निवडल्यानंतर हदगाव शहर शाखा स्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी तालुका अध्यक्ष दिलीप नवसागरे सर,व तालुका सरचिटणीस प्राध्यापक राजेश राऊत सर यांच्यावर सोपवली होती. संपूर्ण शहरातील प्रमुख वार्डामध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन आजच्या बैठकीबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार तालुका शाखा पदाधिकारी यांनी रमाई बुद्ध विहार गौतम नगर हदगाव येथे सार्वजनिक मीटिंग घेऊन भारतीय बौद्ध महासभा हदगाव शहर शाखेची कार्यकारणी एकमताने निवडली आहे. सर्वानुमते हदगाव शहर शाखा अध्यक्ष म्हणून सतीश बळवंतराव गिरबीडे , सरचिटणीस राहुल ग्यानोबाराव वाठोरे, कोषाध्यक्ष चंद्रकांत दिनाजी भोरे ,शहर उपाध्यक्ष विजय शंकरराव परघणे, कार्यालयीन सचिव अजय सिद्धार्थ राऊत ,सचिव संघर्ष शंकर धुळे ,संघटक भिमराव किशनराव वाघमारे, संघटक शिवाजी दिगंबर अवचार , संघटक भिमराव दतदत्तराव सावते , संघटक अमृतराव मरिबा चौरे , संघटक तुळशीराम दवणे , संस्कार सचिव शंकराव हरिभाऊ कळबांडे. यांची निवड करण्यात आली आहे. नूतन हदगाव शहर कार्यकारिणीचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.यावेळी हदगांव तालुका कार्यकारिणी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








