अंगणगाव विद्यालयातील दहावीच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी वीस वर्षानंतर पुन्हा एकत्र
प्रतिनिधी -लक्ष्मण घुगे
राजापूर : शालेय जीवनातील घटनांना उजाळा देत केलेल्या खोड्यांची आठवण काढत विविध किस्से आपल्या मनोगतातुन व्यक्त करत अंगणगाव (ता.येवला) येथील जनता विद्यालयातील इयत्ता दहावीच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी तब्बल वीस वर्षानंतर एकत्र येत स्नेहसंमेलन साजरे झाले. २००५ -०६ या वर्षातील अंगणगाव शाळेतील दहावीची पहिली बॅच आज रविवार (दि.३०) वीस वर्षानंतर एकत्र आली आणि धमाल मस्ती करत आपले जुने दिवस आठवले. शाळेत केलेल्या खोड्या घडलेले किस्से आज सर्वांसमोर सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अंगणगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाची ही पहिली दहावीची बॅच असल्याने सर्वांनाच पुन्हा एकदा वर्गात बसण्यासाठी मोठा उत्साह होता. सकाळी प्रार्थना, कवायत घेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या त्याच वर्गात प्रवेश केला जिथे ते पूर्वी बसायचे. तोच बाक, तोच सहकारी शेजारी आणि शिकवणारे शिक्षक असा दिवस पार पडला. विद्यालयातील विद्यार्थी आता कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी कॉन्टेक्टर, कुणी राजकारणात, कुणी बँकेत, कुणी फोटोग्राफर, कुणी व्यावसायिक तर कुणी यशस्वी शेतकरी आहेत. आदेश काळे, किरण अस्वले, मच्छिंद्र पल्हे, दत्तु गायकवाड, योगेश सोनवणे, सचिन चव्हाण, मोहन चव्हाण, प्रियंका बोराळे, शीतल आठशेरे, महेंद्र बागुल, मोनाली बनकर, सचिन धिवर, सरला काळे, नितीन अस्वले, महेश भालेराव, सुरेखा राजगुरू, रामदास काळे, साजेदा शेख, पुनम कांबळे, ज्योती आठशेरे, मनिषा गायकवाड, विनोद गायकवाड, सारिका वाघ, गणेश राजगुरू, उज्वला भालेराव आदींसह शिक्षक सुनिल पाटील, कौतिक पवार, राजेंद्र बोराळे, हेमलता पाटील उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश काळे यांनी तर आभार योगेश सोनवणे यांनी मानले.
—
अंगणगाव (ता. येवला) : येथील जनता विद्यालयातील पहिली बॅच असलेल्या इयत्ता दहावीचे विद्यार्थी वीस वर्षानंतर एकत्र जमून स्नेहसंमेलन साजरे करताना समवेत शिक्षकवृंद








