संगीतकार शिवराज साने यांचा गौरव
लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक. विष्णू शिंदे गायक कवी. संगीतकार. कार्यक्रमाचे स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी दादर पश्चिम मुंबई या ठिकाणी दिनांक. २७ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे मा.रामदास आठवले (सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार) अँड.आशिष शेलार.(संस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य) संजय शिरसाट (सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य) भीमराव आंबेडकर (अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा.) आनंद शिंदे (सुप्रसिद्ध गायक) डॉ. प्राध्यापक बी.के. डोंगर गावकर (ज्येष्ठ विचारवंत कार्यक्रमाचे अध्यक्ष) चंदनशिवे (दंगलकार प्रसिद्ध कवी) विश्वजीत शिंदे (प्रसिद्ध गायक संगीतकार) राहुल शिंदे (प्रसिद्ध गायक) राजा कांबळे (प्रसिद्ध पोवाडा गायक) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
लोककलेच्या माध्यमातून गेली २५ वर्ष अनेक जिल्ह्यांमध्ये लोक जन जागृती आणि महापुरुषांचे विचार तसेच अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती पर्यावरण स्वच्छता आरोग्य शिक्षण जातीयता अशा अनेक विषयावर गीत गायनाच्या माध्यमातून संगीतकार शिवराज साने यांनी प्रसार केला. त्यांना या प्रसंगी लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई आयोजित.महोत्सव २०२६ मध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संगीतकार शिवराज साने यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी हर्षद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू शिंदे लिखित नवीन तीन पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला. त्रिरत्न.नील नयनी. बहुरंग. महापुरुषांच्या विचारांचा गीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात झाला.
लोक कलावंत सांस्कृतिक मंच,मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महोत्सव २०२६ मध्ये संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे संगीतकार शिवराज साने यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. विविध कला क्षेत्रातील कलाकारांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शिवराज साने यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सन्मानाबद्दल संगीत क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार तसेच कलाप्रेमींकडून संगीतकार शिवराज साने यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा महोत्सवांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.








