पिंपळगाव येथील महेंद्र दादासो भालेराव यांना ग्राहक पंचायत सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली अर्पण
प्रतिनिधी : अनिल गायकवाड
दौंड : तालुक्यातील मौजे पिंपळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील महेंद्र दादासो भालेराव यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने दि ३०/०८/२०२६ रोजी निधन झाले. मनीषा महेंद्र भालेराव. पत्नी. आदिती महेंद्र भालेराव. मुलगी. ओंकार महेंद्र भालेराव. मुलगा तसेच दादासो सोमाजी भालेराव वडील. लता दादासो भालेराव आई असा परिवार असून त्यांच्या जाण्याने सगळे सोयरे मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पिंपळगाव परिसरातील शोकाकुल नागरिकांकडून हळहळ व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दुःखातून भालेराव कुटुंब यांना सावरण्याची भगवंता चरणी प्रार्थना करण्यात आली असून पिंपळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी गुरवार दि ०३/०९/२०२६ रोजी सकाळी १० वाजता पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम बौद्ध पद्धतीने होणार आहे. शोकाकुल भालेराव मापरे जावळे खंडाळे पवार जगताप गायकवाड नितनवरे निकाळजे समस्त ग्रामस्थ पिंपळगाव. याप्रसंगी परिसरातील पै पाहुणे सगेसोयरे मित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सक्रिय कार्यकर्ता म्हणून महेंद्र भालेराव यांची ओळख होती. त्यांनी लडकतवाडी नाथाची वाडी पिंपळगाव कानारखेड शाळा तसेच गलांडवाडी शाळा येथील मुलांना ग्राहक पंचायत सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र अध्यक्ष संदीपभाऊ लगड. तसेच महिला शक्ती आघाडी भारतीताई लगड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील गोरगरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात तसेच गोरगरीब निर्धारण महिलांना रेशनिंग कार्ड काढून देण्यात व संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वृद्धकाळ योजनेमध्ये जेष्ठ नागरिक व महिलांसाठी महत्वपूर्ण मदतीसाठी महेंद्र भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी ग्राहक पंचायतीच्या सहकाऱ्यांच्या बरोबर कोरोना काळामध्ये अनेक नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी दूरदृष्टी ठेवून काम करणारा कार्यकर्ता ग्राहक पंचायत सेवाभावी संस्थेला
मिळणे कठीण आहे. त्यांच्या जाण्याने दौंड तालुक्यात निश्चितच पोकळी निर्माण झाली आहे. महेंद्र भालेराव हा कार्यकर्ता म्हणजे गोरगरीन लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा कार्यकर्ता होता.
त्यांच्या जाण्याने ग्राहक पंचायत सेवाभावी संस्थेच्या सभासदांमध्ये अश्रू अनावर झाले त्यांच्या जाण्याने आखिल भारतीय ग्राहक पंचायत पिंपळगाव शाखा हे कार्यकर्ते म्हणून ओळख होती त्यांची कधी पोकळी भरून निघणार नाही अशी प्रतिक्रिया संस्थेच्या सभासदांनी व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले ग्राहक पंचायत सेवाभावी संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीपभाऊ लगड. तसेच दौंड तालुका सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रमेश लडकत. पिंपळगाव शाखाध्यक्ष हेमंत शिंदे. अजित मापारे. कैलास कदम. प्रशांत नातू. संदीप जगताप. काका अवचट शांताराम बधे. ब्रह्मानंद मापारे अनिल जावळे.अनिल होले. तसेच दौंड तालुका ग्रामीण भागातील पिंपळगाव लडकतवाडी. देलवडी. नाथाची वाडी. उंडवडी भोसलेवाडी. पिंपळगाव राहू. पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांना महेंद्र भालेराव त्यांची वेळोवेळी आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया अनेक सहकार्यांनी व्यक्त केली.








