श्री देवदेवेश्वर मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आकर्षक रांगोळी
प्रतिनिधी. अंबादास मुकटे
माहूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त माहूर येथील श्री देवदेवेश्वर मंदिरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्ताने सुरेश आराध्ये यांनी मंदिर परिसरात आकर्षक व मनमोहक श्रीकृष्णाची रांगोळी साकारली.
विविध रंगांच्या सुंदर संगमातून साकारण्यात आलेल्या श्रीकृष्णाच्या रांगोळीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. रांगोळी पाहण्यासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांनी कौतुकाची दाद देत श्रीकृष्णाच्या कलात्मक प्रतिमेचे दर्शन घेतले. या सुंदर कलाकृतीमुळे मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरणात आणखी भर पडली.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रांगोळीच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या बालरूपाचे सुंदर दर्शन घडवून आणल्याबद्दल सुरेश आराध्ये यांचे भाविकांकडून कौतुक करण्यात आले.








