*किनवट एसटीला मिळाली नवी ‘गती’; पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण*
“आ. भीमराव केराम यांच्या हस्ते लोकार्पण; आणखी दहा बसेससाठी प्रयत्न
प्रतिनिधी : मार्कंडेय सिरामवार
किनवट : राज्य परिवहन महामंडळाकडून किनवट आगाराला देण्यात आलेल्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचा लोकार्पण सोहळा शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. नवीन बसेसमुळे किनवट आगाराच्या ताफ्यात भर पडली असून प्रवाशांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
येत्या काळात किनवटचे बसस्थानक भव्य-दिव्य, सुसज्ज आणि वातानुकूलित करण्याचा आपला प्रयत्न असून, यासाठी मुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे आ. केराम यांनी यावेळी सांगितले. किनवट आणि माहूर आगाराला प्रत्येकी पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मिळाल्या असून, आणखी दहा बसेस मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख अशोक चव्हाण होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी आ. केराम यांच्या प्रयत्नांमुळे किनवट आगाराला नवीन बसेस मिळाल्याचे सांगितले. तसेच आगाराचा उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यासाठी त्यांच्या पाठपुराव्याचे मोलाचे योगदान लाभल्याचे नमूद करत आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना आ. केराम यांनी बस आगार हे सर्वांची सार्वजनिक मालमत्ता असल्याचे सांगितले. आगार परिसरात ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून बस आगार अतिक्रमणमुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, बाबुराव केंद्रे, नगरसेवक संतोष मरस्कोल्हे, स्वीकृत नगरसेवक प्रशांत कोरडे, स्वागत आयनेनिवार (बंटी), विश्वास कोल्हारीकर, बालाजी बामणे, अश्विन पवार, रमेश बद्दीवार, बी.एल. कागणे, गोकुळ भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना पंढरीनाथ कोकेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस.जी. अनंतवार यांनी केले. यावेळी वाहतूक अधीक्षक शीलरत्न ढगे, वाहतूक निरीक्षक बालाजी केंद्रे, वाहतूक नियंत्रक राजकिरण नेमानीवार, वाहतूक नियंत्रक सिद्धार्थ महादेव यांच्यासह गजेंद्र दासरवार, डी.जे. कोंडे, एस.आर. जाधव, विजय कंत्रलवार, सागर पलीकोंडावार, वाहनचालक गजानन चंद्रे, वाहक उत्तम राठोड, अंकुश चव्हाण, संजय केंद्रे, विजय दार्लावार, रवी डोंगरे, हनमनलू नारलेवार, नारायण बोडके, शिषिर चव्हाण, गंगामणी बंडेवार, सुवर्णा खोकले, ज्योती कदम, संगीता बावधने, आरती ताडकुले यांच्यासह महिला वाहक व प्रवासी उपस्थित होते.
लोकार्पणानंतर आ. भीमराव केराम यांनी प्रथम प्रवासी म्हणून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकारांचे तिकीट काढून नवीन बसमधून प्रवास केला. यामुळे लोकार्पण सोहळ्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले.
आ. भीमराव केराम यांच्या हस्ते लोकार्पण; आणखी दहा बसेससाठी प्रयत्न