राजापूर विद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाचे दमदार यश
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजापूर येथील १९ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने येवला तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यालयाच्या कबड्डी संघाने स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. संघातील खेळाडूंच्या मेहनतीला, शिस्तीला आणि संघभावनेला यश मिळाले. या विजयामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव तसेच सर्व संचालक मंडळाने विजयी संघाचे अभिनंदन करून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच क्रीडा शिक्षक, विलास वाघ, अनिल कोतकर, राजेंद्र आव्हाड, प्राचार्य संजय गीते पर्यवेक्षक राजेंद्र वाघ कालेजचे विभाग प्रमुख बापु दराडे व विद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शक आणि पालकांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे हे यश मिळाले, अशी भावना व्यक्त करण्यात आली. जिल्हास्तरीय स्पर्धेतही राजापूर विद्यालयाचा संघ उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“खेळातील जिद्द, कठोर परिश्रम आणि संघभावनेच्या जोरावर यशाची गुरुकिल्ली गाठूया!” असे म्हणत सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.








