*साताळी प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण कोकाटे तर उपाध्यक्षपदी संदीप सोनवणे यांची बिनविरोध निवड*
प्रतिनिधी:लक्ष्मण घुगे
राजापूर: साताळी तालुका येवला येथील पूर्ण प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण काशिनाथ कोकाटे यांची उपाध्यक्षपदी संदीप बबनराव सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष शरद भिकाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कृष्णा गणपत कोकाटे यांच्या विशेष उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
प्राथमिक शाळेच्या गुणवत्तेसाठी काही शालेय साहित्यांसह पुस्तकांची नितांत गरज असल्याने नवीन व्यवस्थापन समितीने शाळेला सर्वतोपरी मदत करून शाळा नव्याने उभी करण्याचे आश्वासन यावेळी दिले. या समितीत बाबासाहेब काळे, प्रवीण कोकाटे,जालिंदर काळे, गणेश आहेर, योगेश मांजरे, सुरेखा सोनवणे, याप्रसंगी माजी उपसरपंच अमोल शिवाजीराव सोनवणे( स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी), सारिका सोनवणे, सोनाली गायकवाड, विलास काळे, पायल काळे, जालिंदर कोकाटे, शिक्षण तज्ञ म्हणून सुगंधाबाई गुलाबराव कोकाटे, शिक्षक सभा प्रतिनिधी अर्चना गायकवाड, विद्यार्थी प्रतिनिधी फलक शामराव गाडे आणि साई संतोष साबळे यांची सदस्य म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
या कार्यकारिणीचे तुळशीराम कोकाटे सरपंच कृष्णा कोकाटे सोसायटीचे चेअरमन अनिल कोकाटे, व्हाईस चेअरमन भागिनाथ कोकाटे, माजी सरपंच सुनील बापू काळे,भाऊसाहेब जगताप, अर्जुन कोकाटे, भिकाजी सोनवणे,वेनुनाथ राजगुरू, भाऊसाहेब कळसकर,जगन्नाथ आहेर, सचिन लांडगे,अश्विनी निटुरकर, बाळासाहेब कोकाटे, सुखदेव काळे, बाबासाहेब कोकाटे, बाळासाहेब काशिनाथ काळे, शांताराम कोकाटे आदींनी अभिनंदन केले.








