मिलिंद इंगळे मुर्तिजापूर : महाराष्ट्राची सद्यस्थिती, संविधानाचे महत्त्व आणि समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी यावर सखोल विचारमंथन घडवून आणणाऱ्या ‘वैखरी व्याख्यानमाला’ तसेच स्व. आमदार प्रतिभाताई (आवाक्का) तिडके जन्मशताब्दी समितीच्या वतीने व्याख्यान व निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षणमंत्री वसंतदादा पुरके होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व तसेच संत गाडगेबाबांनी समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड आणि सत्यनारायण यांसारख्या प्रथांविरोधात केलेल्या प्रबोधनावर भाष्य केले. समाजाने विवेक, विज्ञाननिष्ठ विचार आणि संविधानिक मूल्ये स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हनुमंत पवार (पुणे) यांनी ‘आपला महाराष्ट्र’ या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक परंपरा तसेच वर्तमान परिस्थितीवर भाष्य केले. ‘महाराष्ट्राची सद्यस्थिती व आपली जबाबदारी’ या व्याख्यानाच्या विषयातून त्यांनी नागरिकांनी आपल्या सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून राज्याच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.
याच विषयावर आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवर वक्त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
निबंध स्पर्धेचे पारितोषिक पुढील प्रमाणे
निबंध स्पर्धा वरिष्ठ गट
प्रथम -ऐश्वरी अनिल वाकळे B.sc,3 (श्री डॉ. आर जी राठोड कला व विज्ञान महाविद्यालय मुर्तीजापुर), व्दितीय – साक्षी विनोद सरदार बी.ए. १(श्री गाडगे महाराज महाविद्यालय मुर्तीजापुर)
व्दितीय – अश्विनी अनिल तायडे बी.ए.१ (श्री गाडगे महाराज महाविद्यालय मुर्तीजापुर)
तृतीय -दिपाली राजेश प्रभू बी.ए.२ (श्री मधुकरराव पवार कला महाविद्यालय मुर्तीजापुर)
निबंध स्पर्धा कनिष्ठ पारितोषिक प्रथम कु.समृध्दी वसंत सगने ११ वी (जी.एम.टेकाडे कनिष्ठ महाविद्यालय कुरूम),व्दितीय -ज्ञानेश्वरी संतोष महानकर ११ वी (भारतीय ज्ञानपीठ मुर्तिजापूर),तृतीय -संचित सुरेश वानखडे १२ वी. (जवाहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुरूम)प्रोत्साहनपर
अनन्या राजेश गुप्ता 12वी (गाडगे महाराज कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मुर्तीजापुर), आरुषी सुनील चिंचे (जयाजी महाराज हिरपूर) दिव्या वानखडे १२वी (श्री वसंतराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय हातगाव मुर्तीजापुर)
विद्यार्थ्यांनी व सहभागी स्पर्धकांनी महाराष्ट्राच्या सद्यस्थितीबाबत मांडलेल्या विचारांचे यावेळी कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्थ श्रीकांत तिडके यांनी केले तर
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. श्रीकांत तिडके,डॉ.समृद्धी तिडके, मिलिंद अवचित इंगळे तसेच निबंध स्पर्धेचे परीक्षण व नियोजन प्रा.अविनाश बेलाडकर,प्रा.चिंतामण कांबळे, पोटे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साजिद शेख सर यांनी प्रभावीपणे केले.
विचारांची देवाणघेवाण, संविधानिक मूल्यांचे भान आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.








