सुनिल एच गायकवाड | पिंपरी चिंचवड
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड : मातंग एकता आंदोलन संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणीची कार्यकर्ता संवाद व संघटन बांधणी बैठक संघटनेचे कार्याध्यक्ष मा. अविनाश भाऊ बागवे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
यावेळी महाराष्ट्र राज्य समन्वयक मा. विठ्ठलरावजी थोरात, पुणे शहर अध्यक्ष दयानंद अडागळे, माजी अध्यक्ष मनोजजी तोरडमल, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया अध्यक्ष सुनील बावकर, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष दत्तू चव्हाण, युवक अध्यक्ष विशाल कसबे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष हिरामण खवळे,कुंदन कसबे, सचिव सतीश भवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे, नवनाथ शेलार, तुकाराम तुपे,कुलदीप लोणके,कैलास पाटोळे, अजय खंडागळे, साहेबराव थोरात, अक्षय उदगिरे, सुरेश सकट, बाळासाहेब पाटोळे, विशाल जाधव, पांडुरंग पाटोळे, संजय जाधव, ज्ञानेश्वर लोंढे, विजय देवरे, रविकांत राजगुरू, सुरेश कांबळे, जितू जाधव, निवृत्ती जाधव, भैरव जाधव, उत्तम सकाटे, ॲड.अजित गायकवाड, सागर जावळे, प्रतिक जाधव, संजय हातागळे, धनाजी पोळ, सतिश वैराळ ,विजय कांबळे, दिपक लोखंडे, स्वामिनाथ शितोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीमध्ये संघटनेची शहरातील आगामी वाटचाल, संघटनात्मक बांधणी, नवीन कार्यकर्त्यांना जोडणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे तसेच समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात मातंग समाज लक्षणीय आहे आणि तो सदैव मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या सोबत आहे राज्या मध्ये सध्या खुप मोठ्या प्रमाणावर जातीयवाद वाढलेला आहे जाती जाती मध्ये भांडणे लावण्याचे काम काही विघातक विचारसरणीचे लोक करताना दिसत आहेत. त्यात मागासवर्गीय समाजा समाजात भांडणे लावण्याची कामे या लोकांकडून होत आहे. पण सर्वांना आळा घालण्याच काम येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. माजी गृहराज्यमंत्री आदरणीय रमेशदादा बागवे साहेब यांनी फुले,शाहू,आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संघटनेची वाटचाल केलेली आहे त्याचे द्योतक म्हणून आज महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक खेडोपाड्यात संघटनेची शाखा कार्यरत आहे. येत्या काळात पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्नांबाबत महानगरपालिकेत जाऊन आयुक्त साहेब यांची भेट घेणार आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
तर पिंपरी-चिंचवड शहरात येत्या काळात एक भव्य असा मेळावा व शंभर शाखांचे विस्तारीकरण करण्याचे वचन युवक अध्यक्ष विशाल कसबे यांनी केले. सदरील बैठकीचे आयोजन युवक अध्यक्ष विशाल कसबे व शहर अध्यक्ष दत्तू चव्हाण यांनी केले होते.








