अकोला जिल्हात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतमजुरांना काम देण्याची मागणी !
बहुजन मुक्ती पार्टीने दिले निवेदन.
चंदन जंजाळ ( प्रतिनिधी )
अकोला : राज्यात गेल्या ४० दिवसा पासून पाउस खंडीत झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण. झाले आहे.
थंडीत पडलेल्या पावसा मुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे शेतीचे हंगामी काम नसल्यामळे शेत मजूरांची आर्थिक तारांबळ होत होत असल्याने राजाचे मा मुख्यमंत्री याना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले शेत मजूराला कलम २१, ३८, ३९, ४१, ४३, ४७, ४८ नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी अधिनियम २००५ नुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम मार्फत रोजगार हमीचे काम देण्यात यावे व त्याना आर्थिक संकटातून बाहेर काढावे तर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान व पाऊस नसल्याने तालुक्यात व जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि शेतकऱ्याला 24 तास वीजपुरवठा करून विद्युत देण्यात यावी अशा तीन मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालय बाळापुर येथे बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते यांनी निवेदन दिले यावेळी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष विनोद शिरसाठ, गजानन तनपुरे, गजानन पद्मने सुभेदार हातोले सतीश अवचार शेख मुजमबिल तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.








