बार्टि च्या वतीने शिक्षक दिन साजरा
गंगाधर कांबळे | प्रतिनिधी
दिनांक 5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा माळ येथे बार्टिच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टिच्या वतीने समतादुत दिलीप सोंडारे यांनी डॉ.राधाकॄष्णन सर्वपल्ली यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.यावेळी डॉ.राधाकॄष्णन सर्वपल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन समतादुत दिलीप सोंडारे, शिक्षीका सौ.गौतमी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी समतादुत यांनी शिक्षण आणि शिक्षक यांच्या बदल प्रबोधन केले.
यावेळी शालेय पोषण आहाराचे कर्मचारी सौ.शोभा सोंडारे आणि राजश्री जाधव यांनी गौतमी कांबळे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
समतादुत दिलीप सोंडारे यांनी आजची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे नाते यावर सविस्तर मार्गदर्शन केले.








