वाढदिवसा निमित्त रक्तदान चा महा संकल्प : यावल मध्ये भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी,
यावल : आदरणीय हर्षवर्धनजी रामकृष्णजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा संदेश देत हे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
“रक्तदान करा, जीवनदान द्या” या प्रेरणादायी संदेशाला प्रतिसाद देत अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा आदर्श या शिबिरातून निर्माण करण्यात आला.
या शिबिरास यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांतभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील, शहराध्यक्ष मो. हकीम शेठ, नगरसेवक करीम मेंबर, उमर कच्छी, समीर मेंबर, अझर मेंबर, मझर मेंबर, निसार मोमीन, पराग सराफ, अताऊल्ला शेठ, रफिक टेलर, शफी भाई, शरीफ भाई, अकील सर, अमोल भाऊ भिरुड, टेनु सोनार, असलम मेंबर, कमाल कान्हा, महिला तालुका अध्यक्ष कल्पना अजय तायडे, गणेश गुरव सर, फैजपूरचे युवराज भंगाळे, राजू आस्वार, शरद पाटील, नईम भाई, गिरीश देशमुख, सरफराज पिंजरी, पिरण तडवी, बशीर तडवी, रज्जाक तडवी, छबू तडवी, राजु तडवी,सुलोचना तायडे, सुनील पाटील, अभय महाजन, उमेश जावळे, अनिल पाटील, धीरज कुरकुरे, सूरज राजपूत, सतीश आबा पाटील, भरत पाटील, गौरव सोनवणे, उमेश नाफडे, दुर्गदास महाजन, , तायडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध व्हावा आणि रक्तदानाची सामाजिक चळवळ अधिक व्यापक व्हावी, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी असते, हा संदेश देणारे हे रक्तदान शिबिर यावल तालुक्यात सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरले.








