सावळी विहीर येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी..
शिर्डी.. राजेंद्र दुनबळे
सावळी विहीर बुद्रुक येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपात श्री संत सेना महाराज नाभिक संघटनेच्या वतीने संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
सकाळी आठ वाजे दरम्यान संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर 9 वाजता संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या भक्तीमय वातावरणात सावळीवीहीर गावात काढण्यात आली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते.माजी सरपंच बाळासाहेब जपे.सुनील जपे. गणेश आगलावे. राजेंद्र दुनबळे .
गणेश कापसे.राजेंद्र कापसे.आदी मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकी नंतर
निर्मळ महाराज यांचे आध्यात्मिक प्रवचनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.12 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी
मनोज बिडवे. दीपक कदम मच्छिंद्र कदम वसंत कणसे संतोष कदम विलास कदम सुनील कदम कैलास सोनवणे संदीप अहिरे स्वप्निल अहिरे गणेश कणसे गोरख कणसे साहिल जगताप नंदू शिंदे लिंबा वाघ किरण कदम सार्थक अहिरे महेश सोनवणे समर्थ दळवी पंकज कदम. आधीसह भक्तगण महिला मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.








