शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न
विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांचा विषमतावादी व्यवस्थेवर प्रहार”
किनवट प्रतिनिधी- मार्कंडेय सिरामवार
शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांचा वाढदिवस ७ सप्टेंबर रोजी किनवट तालुक्यांत विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने किनवट येथील साईवंदना मंगल कार्यालयात भव्य अभिष्टचिंतन सोहळा व जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण भाषाशैलीत देशातील विषमतावादी व्यवस्थेवर जोरदार फटकेबाजी केली.
शिवसेनेचे शहरप्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक प्रशांत कोरडे यांनी या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते.
जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे व नितीन चंदनशिवे यांचे किनवट शहरात आगमन होताच जिजामाता चौकात किनवट तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. तसेच चार जेसीबी मशीनद्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना ज्योतिबा खराटे म्हणाले, “विद्यार्थी दशेपासून वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसेनेत निष्ठेने काम करत आलो आहे. मागील २५ वर्षांत अनेक राजकीय-सामाजिक चढ-उतार पाहिले. शोषित, उपेक्षित आणि वंचितांसाठी संघर्ष करणे हाच शिवसेनेचा बाणा आहे. छातीवर गोळ्या झेलण्याची वेळ आली तरी शिवसेना सोडण्याचा विचार मनात आणला नाही. सत्ता असो वा नसो, आमचा संघर्ष असाच सुरू राहील.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले महाराष्ट्राचे विद्रोही कवी ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत देशातील सद्य राजकीय व शैक्षणिक धोरणावर जोरदार प्रहार केला. ‘राजा, घोडा आणि गाढव’ या कथेतून त्यांनी पदवी व शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले, तर ‘या कापसाचं काय करायचं’ या कथेतून विकासाला अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तींवर शेलक्या शब्दांत टीका करत रसिकांना हसविले. तसेच ‘आपला कांबळे लय हुशार’ या कवितेतून शोषित-उपेक्षित घटकांनी जात-धर्म विसरून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यास शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दिलीप वेदपाठक, सौ. बेबीताई प्रदीप नाईक, किनवटच्या नगराध्यक्ष सौ. सुजाता विनोद एंड्रलवार,युवानेते करण एंड्रलवार, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसांनी, अनिल रुणवाल, उमेश जाधव,मारोती दिवसे पाटील, जितू चोले उपनगराध्यक्ष हसन लाला,जनाबाई डुडुळे,नंदिनीताई टारपे, विमलताई ज्योतिबा खराटे एड. अर्चित नाईक, नगरसेवक अभय महाजन, मारुती मुनेश्वर, अड यश खराटे,नगरसेवक प्रवीण राठोड, रोहन एंड्रलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी सौ. बेबीताई नाईक, फिरोज दोसानी,करण एंड्रलवार,सौ.नंदिनीताई टारपे यांनी मनोगतातून ज्योतिबा दादांच्या नेतृत्वाचा गौरव करत त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत कोरडे यांनी केले, सूत्रसंचालन श्री. कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन मोहन पांचाळ यांनी मानले. दिवसभरात विविध क्षेत्रांतील नेते, कार्यकर्ते व हितचिंतकांनी हार-तुरे देऊन ज्योतिबा खराटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेनेचे तालुकाप्रमुख अतुल दर्शनवाड,माजी शहरप्रमुख संतोष यलचलवार,प्रमोद जाधव शुभम देवकते, संतोष तक्कलवार भानू कोत्तूरवार,प्रवीण नाईकवाडे चंद्रमणी कसबे,आनंद क्यतमवार राकेश गंनोजवार, शैलेश बेलसरवार आदींनी परिश्रम घेतले








