कै. भागाबाई काशिनाथ आव्हाड यांचे दुःखद निधन
प्रतिनिधी / लक्ष्मण घुगे
येवला तालुक्यातील राजापूर येथील कै भागाबाई काशिनाथ आव्हाड यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुलं सुना नातवंड असा परिवार आहे येवला तालुका शिवसेना तालुका उपप्रमुख अशोक आव्हाड व व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव आव्हाड यांच्या मातोश्री होत. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या दुःखात बातमी सम्राट परिवार सहभागी आहे.








