कॅन्सर फाऊंडेशन तर्फे आरोग्य शिबीर उत्साहात साजरा
प्रतिनिधी // अमोल मदने
माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा कॅन्सर फाऊंडेशन टेंभूर्णी यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत कॅन्सर निदान शिबिरात १३२ जणांनी आपली तपासणी करून घेतली. डॉ. दादासाहेब माने यांच्या यशश्री हॉस्पिटल येथे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उदघाटन माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कृ.ऊ.बा.स.चे संचालक रमेश पाटील उपस्थित होते. यावेळी गर्भाशय मुखाचा कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर यासह सर्व
प्रकारच्या कॅन्सरची तपासणी करण्यात आली. बार्शीतील साईसंजीवनी कॅन्सर हॉस्पिटलचे सर्जन डॉ. राहुल मांजरे आणि पंढरपूर येथील सेवा कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. अमित इनामदार यांनी तपासण्या केल्या. प्रास्ताविक टेंभूर्णी सेवा कॅन्सर फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश भणगे यांनी केले. यावेळी डॉ. उमेश झाडबुके, डॉ. विनायक गंभीरे, डॉ. दादासाहेब माने, डॉ. आनंद खडके, डॉ. विशाल जाधव, डॉ. जोतीराम गव्हाणे, किरण पराडे, महेश कोठारी, परमेश्वर खरात, श्रीकांत लोंढे, सुनील महामुनी, संतोष पाणबुडे, महेश कोकिळ, संजय अदापुरे, आशुतोष क्षीरसागर, वेदांत भणगे, सोहेल मुजावर यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.








