परसाडे येथे स्वर्गीय हासन सायबु तडवी यांच्या कुटुंबीयांची नेत्यांकडून सांत्वनपर भेट
विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; तडवी परिवाराला दिला धीर
बशीर तडवी | जळगाव
परसाडे (ता. यावल) : यावल तालुक्यातील सातपुडा परिसरातील परसाडे येथील रहिवासी तथा भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष हुसेन साहेबु तडवी यांचे मोठे बंधू स्वर्गीय हासन सायबु तडवी यांच्या आकस्मिक निधनाने तडवी परिवारासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी परसाडे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत तडवी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
स्वर्गीय हासन सायबु तडवी यांच्या निधनानंतर माजी मंत्री, विरोधी पक्षनेते तथा विद्यमान आमदार एकनाथराव खडसे यांनी परसाडे येथे तडवी परिवाराची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. त्यांच्या समवेत चंद्रकांत नेवे सर तसेच मुक्ताईनगरचे माजी सभापती निवृत्ती पाटील उपस्थित होते.
यापूर्वीही यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय भाऊ चौधरी, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, तसेच कला, विज्ञान महाविद्यालय भालोद येथील सर्व स्टाफ आणि व्यास धनवर्षा बँक, यावलचे संचालक मंडळ यांच्यासह विविध मान्यवरांनी तडवी परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.
कुटुंबीयांना दिला धीर
सांत्वनपर भेटीच्या प्रसंगी तडवी परिवारातील ज्येष्ठ सदस्य माजी सरपंच हुसेन साहेब तडवी, उपसरपंच सुलेमान कान्हा तडवी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष कमाल कान्हा तडवी, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष मजीत आप्पा तडवी, काँग्रेस आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर तडवी, तसेच रोशन बाबा तडवी, अरमान सुपडू तडवी, रमेश सोना सावळे, मुबारक तडवी, मासूम तडवी, जहांगीर तडवी, अजित तडवी, राजू उघडू तडवी, रशीद तडवी, लालखा तडवी, शब्बीर तडवी, मयबू तडवी, सरफराज तडवी, रफिक तडवी, नामदार तडवी, पीरखा तडवी यांच्यासह इतर कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय हासन सायबु तडवी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या आठवणींना उजाळा देत तडवी परिवाराच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. तसेच या कठीण प्रसंगी कुटुंबीयांनी धैर्याने परिस्थितीला सामोरे जावे, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
परिसरात शोककळा
स्वर्गीय हासन सायबु तडवी हे तडवी परिवारातील जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने तडवी परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुःखद प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी परिवाराच्या पाठीशी उभे राहत त्यांना आधार दिला.
स्वर्गीय हासन सायबु तडवी यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि तडवी परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्वर्गीय हासन सायबु तडवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!








