दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड शहरात लुटमारी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नजर ठेवून मौल्यवान वस्तूवर डंल्ला मारला जात आहे. याबाबत दौंड शहरामध्ये नुकतिच एक घटना घडली आहे. १ लाख ४० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने पळून गेला आहे या संदर्भात खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तींकडून दौंड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिंयादी सचिन विजय पवार वय २९ वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा.माळेगाव बारामती ता.बारामती जि.पुणे. याचे फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजि.नं ७२०/२०२६ भा.न्या.संहिता कलम ३०३(२).प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, मौजे दौंड शहरातील शिवसागर ट्रेडिंग या दुकाना समोर लावलेल्या मोटर सायकलवर ठेवलेल्या १ लाख ४० हजार रुपये किमतीची मार्लबोरो ॲडव्हान्स ३२ बॉक्स ६४० पॅकेट शिगारेट बॉक्स पिशवी अज्ञात व्यक्तीने नजर ठेवून डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटने बाबत सीसीटीव्ही फुटेज मध्ये अज्ञात इसम स्पष्ट दिसून येत आहे. हि घटना दिंनाक २८/०९/२०२६ रोजी दुपारी १२:४५ वाजे सुमारास मौजे दौंड येथील शिवसागर ट्रेडिंग या दुकाना समोर घडली आहे.
वरील वर्णनाचा एकूण किंमत १ लाख ४० हजार ९०० रुपये किमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता लबाडीच्या एरियाद्याने चोरी करून चोरून नेला आहे वगैरे मजकुरावरून वरून दाखल. दाखल अंमलदार – सहाय्यक फौजदार साबळे तपास अंमलदार – पोलीस हवालदार बोराडे.








