मुर्तिजापुर येथे मेरा युवा भारत केंद्र अकोला च्या वतीने स्वच्छता पंधरवाडा निमित्त विविध उपक्रम …
बातमी सम्राट | मिलिंद इंगळे | अकोला | दि. ०४/१०/२०२६/
मेरा युवा भारत केंद्र अकोला युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार व नेहरू युवा बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी मुर्तिजापुर च्या विद्यमाने स्वच्छता पंधरवाडा हा कार्यक्रम राबविण्यात आला या मध्ये स्वच्छता शपथ रक्तदान शिबिर , स्वच्छता विषयक माहिती , आपल्यावर पाण्याचे मोठ संकट येणार आहे तरी पाणी वाचवा पाणी जपून वापरा पाण्याचे महत्व इतरांना हि सांगा तथा आपले आरोग्य जपा कारण आपले आरोग्य हिच आपली संपत्ती आहे जास्त वेळ मोबाईलचा वापर टाळा
फिट रहा स्वास्थ रहा करो योग रहो निरोग एक तास स्वतःस वृक्ष संवर्धन पर्यावरण या विषयी विद्यार्थी युवा युवती महिला पुरुष यांना महत्व सांगून मोठी जनजागृती करण्यात आली सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तथा विविध समाजपयोगी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले हा उपक्रम सप्ताह भर घेण्यात आला शेवटी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी लालबहादूर शास्त्रीजी यांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर उपक्रम निपाने सर जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत केंद्र अकोला यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले आयोजन व नियोजन नेहरू युवा बंहू . क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे विलास वानखडे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला
ग्राम नागोली येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले आदर्श कन्या विद्यालय मुर्तिजापुर येथे स्वच्छता शपथ तथा त्यांना विविध विषयी माहिती देण्यात आली मुख्याध्यापक सौ गावंडे मॅडम सर्व शिक्षक उपस्थित होते जयाजी महाराज विद्यालयाचे श्री संभाजीराव डाबेराव यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता शपथ पाणी वाचवा स्वच्छता अशा अनेक विषय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या वेळी सर्व शिक्षक यांची उपस्थिती लाभली सौ .सरोदे मॅडम चित्रकार प्रकाश निरखे पोळकट यांनी पण मार्गदर्शन केले एनरजेटिक फिटनेश क्लब चे रमेश दर्यानी सह सर्व टिम नागोली येथील तंटामुक्ती अध्यक्ष प्रीतम सरोदे सामाजिक कार्यकर्ते उज्वल अनभोरे गजानन चव्हाण गौतम अंभोरे ऋषिकेश वाघमारे प्रमोद इंगळे डॉ .दिनेश हिवराळे डॉ .विद्याधर करमकर मंडळाचे सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले .








