वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास; दौंड परिवारावर दुःखाचा डोंगर
प्रतिनिधी : मधुकर केदार
शेवगाव : डॉ. नामदेव तुळशीराम दौंड यांचे वडील श्री. तुळशीराम चिमाजी दौंड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने दौंड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्री. तुळशीराम दौंड यांच्या निधनाने कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. आयुष्यभर लाभलेली माया, जिव्हाळा आणि संस्कारांच्या आठवणी मागे ठेवून त्यांनी जगाचा निरोप घेतला. वडिलांचे छत्र हरपल्याने डॉ. नामदेव दौंड व त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा प्रसंग ओढवला आहे.
या दुःखद प्रसंगी नातेवाईक, आप्तस्वकीय आणि परिचितांकडून शोकभावना व्यक्त करण्यात येत आहेत. दिवंगत श्री. तुळशीराम चिमाजी दौंड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.








