ओंकार फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
कोठली, ता. भडगाव | प्रतिनिधी – किशोर रायसाकडा
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ओंकार फाउंडेशन, कोठली यांच्या वतीने प्राथमिक शाळा व वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. ओंकार फाउंडेशनचे अध्यक्ष तथा राज्य शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त श्री. प्रकाश कोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.
कार्यक्रमास फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री. शांताराम कोतकर, श्री. विनोद कोतकर, ग्रामपंचायत सदस्य बापू श्रावण नाईक, निंभोरा ग्रामपंचायत सदस्य श्री. गौतम मोरे, श्री. शिवाजी नाईक, श्री. विलास सुदाम पाटील, श्री. रवींद्र थोरात, श्री. हिम्मत मरसाळे, श्री. पोलाद गायकवाड, श्री. अभिमन्यू कोतकर, श्री. दीपक कोतकर, श्री. पुंडलिक कोळी, श्री. हिरामण भराडी, श्री. शंकर भराडी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम ओंकार फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.








