सरस्वती शिक्षण संस्थेच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन
किनवट प्रतिनिधी – मार्कंडेय सिरमवार
किनवट : सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने दि. १४ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध अशा कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती संकुल परिसरात करण्यात आले यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून राष्ट्रीय एकात्मतेचा व राष्ट्रभावनेचा संदेश समाजाला दिला. यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव प्रा कृष्णा कुमार नेमानीवार तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद भंडारे यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीला आरंभ झाला मान्यवरांनी या तिरंगा रॅलीला शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी भारत माता की जय तसेच वंदे मातरम चा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातातला तिरंगा ध्वज व घोषणा यामुळे एक चैतन्याचे वातावरण यावेळी निर्माण झाले.

तिरंगा रॅली नंतर द्वितीय सत्रात महाविद्यालयाच्या सभागृहात बौद्धिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .आनंद भंडारे हे होते तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन डॉ.सुनील व्यवहारे यांनी केले. प्रारंभी दीप प्रज्वलन व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रोफेसर डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी केले आपल्या मार्गदर्शनातून डॉ सुनील व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतु व कार्य यावर प्रकाश टाकला. मन मेंदू व मनगट परिपक्व असेल तर आपण कोणते ही आव्हान सहज साध्य पेलू शकतो असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ आनंद भंडारे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ किरण आयनेनीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ मनोहर थोरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अण्णासाहेब सोळंके , रामकिशन चाटे, डॉ अजय किटे, प्रा.विवेक चनमनवार ग्रंथपाल माधवराव नेमानीवार सेवक गोविंद ताडपेलीवार, मधुकर ताडपेलीवार, अनुमती करुणा नेमानीवार, श्रीमती वैशाली बेंजेकीवार यांनी सहकार्य केले कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








