बुद्धिस्ट सेमिनरीची स्थापना एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल -ॲड.सुभाष जौंजाळे
राहुरी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध सेमिनरीची स्थापना एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल असल्याचे मत ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ (भारतीय बौद्ध महासभा) ट्रस्टी चेअरमन व सेमिनरी प्रमुख ॲड.सुभाष जौंजाळे यांनी व्यक्त केले. ते बौद्ध सेमिनरी विभागाचा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात २९ ऑगस्ट २०२६ रोजी बोलत होते. हे उद्घाटन अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडले.
उक्त कार्यक्रमात संपूर्ण भारतातून शेकडो बौद्ध कार्यकर्त्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. ऑनलाइन ॲपवर लोड आल्यामुळे अनेकांना जॉईन होता आले नाही. प्रसंगी संस्थेचे ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष मान. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.
ॲड. सुभाष जौंजाळे पुढे म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माच्या व्यापक प्रचार-प्रसारासाठी प्रशिक्षित बौद्ध भिक्षू आणि सेमिनरीची गरज धम्मप्रवेशाच्या आधीच ओळखली होती. प्रशिक्षित बौद्ध भिक्षू/धम्म प्रचारकांच्या एका सशक्त व्यवस्थेद्वारे बौद्ध धम्म भारत व जागतिक स्तरावर संघटितपणे स्थापित करू इच्छित होते.
हे केवळ एका विभागाचे उद्घाटन नसून, भारतातील बौद्ध धम्माच्या नियोजित, वैज्ञानिक आणि संघटित प्रचार-प्रसाराच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.”
या कार्यक्रमास बोर्ड ऑफ ट्रस्टीचे सर्व मान. अंबर सहारे (ट्रस्टी सरचिटणीस), नरसीहालू भंडार , अरुण पोळ , डॉ. राजाराम बडगे , कॅप्टन प्रवीण निखाडे , एस. के. भंडारे , जगजीवन प्रसाद इत्यादी विश्वस्तासह राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई, राज्याध्यक्ष उत्तमराव बोराडे, राज्य सरचिटणीस अशोक केदारे , तेलंगणाचे अध्यक्ष समता सुदर्शन , मध्यप्रदेशचे भास्कर ससाने,यांच्यासह विविध राज्यांचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदनाने झाली. त्यानंतर सत्येंद्र तेलतुंबडे (सचिव—महाराष्ट्र सेमिनरी विभाग) यांच्या सूत्रांनुसार बौद्ध वंदना व सूत्र पाठ करण्यात आला.
त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय ॲड. सुभाष जौंजाळे यांनी बोधीवृक्षाला जल अर्पण करून राष्ट्रीय स्तरावर स्थापन होणाऱ्या सेमिनरीचे उद्घाटन केले. उद्घाटनाच्या घोषणेनंतर सातारा शहरात समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी व सैनिकांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना (सॅल्यूट) दिली. या वेळी “घरोघरी बुद्ध वंदना, हाच नारा राहील आमचा” आणि “जय भीम”च्या घोषणा देण्यात आल्या.
या ऐतिहासिक प्रसंगी विविध राज्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात उत्साहात कार्यक्रम आयोजित केले. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, रोषणाई, मिठाई वाटप आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध राज्यांचे अध्यक्ष, जिल्हा, तालुका व शहर स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सक्रिय योगदान लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टी सरचिटणीस अंबर सहारे यांनी केले. वंदना सूत्रपठण व आभार प्रदर्शन सत्येंद्र तेलतुंबडे यांनी केले. शेवटी सामूहिक धम्मपालन गाथेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यामधून ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये भाऊसाहेब जगदाळे , संतोष कोल्हे,छगन रणदिवे ,लक्ष्मण साठे, पंकज शिंदे,ज्या जगदाळे, बाळासाहेब कोल्हे (नेवासा), राजेंद्र मेहरखांब(राहाता), महेंद्र विधाते (कोपरगाव),सुरेश घोक्षे, भंते धम्मपाल, वसंत साबळे, बाळासाहेब गजभिव, बाळासाहेब धस, (शेवगाव), संदीप बोर्डे (पाथर्डी), सुगंधराव इंगळे, प्रकाश सावंत,मरिबा पटेकर, कैलास लोखंडे (श्रीरामपूर), साहेबराव टपाल, वाय. एल.मन्तोडे(संगमनेर), माया मोरे,ईश्वर खिलारे , मेघराज बचुटे(राहुरी), राजेंद्र साळवे, प्रा. आनंद मेढे, भगवंत गायकवाड, संतोष कांबळे,(अहिल्या नगर), सावळेराम गायकवाड (अकोले), उषाताई पठारे, कविता अहिरे, राजश्री सोनवणे, (मनमाड), रजिस्टार डी. एम. घोडके,इंजि. बबनराव अहिरे, (नाशिक), दयानंद घोडके, (मनमाड), अरुण बल्लाळ (पैठण) ,रेवन घोडके (श्रीगोंदा), श्रद्धा येळिंजे,स्वाती गायकवाड (मुंबई) इत्यादी मान्यवर आपापल्या परिसरातील विहारात मोठ्या समूहाने उपस्थित होते.








