आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीची भुसावळ ला महत्त्वपूर्ण बैठक संपन्न..
जळगाव जनआक्रोश महामोर्चा च्या तयारीला वेग….
बातमी सम्राट | चक्रधर महाले |भुसावळ | दि. २३ /०९/२६ /
आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात, अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींची एकता अबाधित ठेवण्यासाठी, सामाजिक न्याय व भारतीय संविधानाच्या संरक्षणाच्या उद्देशाने भुसावळ येथील एससी-एसटी कार्यालय (DRM कार्यालयाजवळ) येथे बुधवार (दि. २३ सप्टेंबर) रोजी दुपारी ४ वाजता आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती, जळगाव यांच्या वतीने महत्त्वपूर्ण नियोजन बैठक संपन्न झाली.
बैठकीत रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव येथील शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक येथे होणाऱ्या जनआक्रोश महामोर्चाच्या पूर्वतयारीसह रावेर लोकसभा मतदारसंघातील व्यापक जनसंपर्क, संघटनात्मक बांधणी, गावनिहाय नियोजन आणि सर्व ५९ जातींचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मुकुंद सपकाळे, राजू सूर्यवंशी, विनोद सोनवणे आणि शांताराम जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित वक्त्यांनी अनुसूचित जातीच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी, सामाजिक ऐक्य दृढ करण्यासाठी आणि संविधानवादी विचार अधिक व्यापक करण्यासाठी सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने जनआक्रोश महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या बैठकीस सुधीर जंजाळे, सुमंगल अहिरे, दिनेश इखारे,वंदना ताई आराक, विजय सावळे, युवराज नरवाडे, प्रशांत नरवाडे,सतिष गायकवाड ,लखन पानपाटील, मेजर मकासरे, शरद सोनवणे, उमेश गाढे, सुरेश यशोदे, वाल्मीक देहाडे,महेश तायडे, महेश सपकाळे, कामराज गुरचळ,अरुण नरवाडे ,बंटी नरवाडे, गजानन निंबाळकर, गणेश जाधव,विक्रम वानखेडे, पंकज नरवाडे, आनंद अवसरमल,विवेक नरवाडे ,सागर तायडे, विनोद मोरे,अजय इंगळे , प्रशांत तायडे, प्रकाश सोनवणे,सरजु तायडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संविधानवादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








