कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर चा पै. तुषार रणसिंग चमकला , ६५ किलो गटात…
तालुका व जिल्ह्यात प्रथम, विभागीय स्पर्धेसाठी निवड !
बातमी सम्राट | दिनेश गायकवाड | राहुरी | दि.०४/१०/२०२६/
राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशाला, राहुरीचा विद्यार्थी पै. तुषार कैलास रणसिंग याने शालेय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत दुहेरी सुवर्ण यश मिळवले आहे.
नुकत्याच झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत ६५ किलोग्रॅम वजन गटात (ग्रीको रोमन) त्याने प्रथम तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेतही आपले वर्चस्व कायम राखत पुन्हा प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले.
या दोन सुवर्णपदकांच्या जोरावर त्याची सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तुषारच्या या घवघवीत यशामुळे राहुरी तालुक्यासह शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या या यशाबद्दल रणसिंग जिम व तसेच संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








