पुणे प्रतिनिधी: “आम्ही भारताचे लोक” आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने स्मृतीशेष कमलबाई बळीराम सोनवणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त (मृत्यू दिनांक: १०-११-२०२१) एका भव्य राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा मुख्य विषय “आई” हा असून ही स्पर्धा सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी पूर्णपणे निःशुल्क आहे. स्पर्धेत सहभागी होणारी कविता स्वरचित असावी; AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या मदतीने तयार केलेली कविता स्वीकारली जाणार नाही.
स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढले जाणार असून स्मृतीशेष कमलबाई बळीराम सोनवणे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आयु. अंकुश बळीराम सोनवणे यांच्यातर्फे विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच निवडक उत्कृष्ट ५० कवितांचा एक प्रतिनिधिक काव्यसंग्रह “आम्ही भारताचे लोक” या नावाने प्रकाशित केला जाणार आहे.
कविता ऑनलाईन व्हाट्सॲपवर पाठवताना मेसेजमध्ये “स्पर्धेसाठी” असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असून कविता पाठवण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत आहे. या उपक्रमाचे मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक (आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य) हे आहेत. अधिक माहिती व कविता पाठवण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अविनाश मनवर (9699500275), सुनंदा साखळे (9820276312), वैशाली ढेठे (7709912597) यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच स्पर्धेकरिता रिता रामटेके (7841856636), स्वाती चव्हाण (7066375005) आणि अंकुश सोनवणे (9503446938) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य संघशिल भद्रे सर आणि आयोजकांकडून करण्यात आले आहे.








